Q & A
वचननाम्याबाबत बोलायचे झाले, तर नवीन आश्वासने दिली आहेत. पण मागील वचनांपैकी किती पूर्ण झाली आणि किती अपूर्ण राहिली याचा हिशोब दिलेला नाही.
सेवा विकास पॅनेलने सभासदांसमोर 2016 ते 2026 चा कार्यअहवाल आणि 2026 चा वचननामा मांडलेला आहे. विरोधकही मतदार आहेत म्हणून त्यांनीही आमचा कार्यअहवाल आणि वचननामा जरुर वाचावा. तो वाचल्यावर गेल्या 10 वर्षात संस्थेने काय प्रगती केली हे निश्चित कळेल. आणि विरोधकांचही मतपरिवर्तन होऊन तेही सेवा विकास पॅनेलाच्या उमेदवारांना मतदान करतील याची मला खात्री आहे.
2011 साली आपल्या पतसंस्था ची सभासद संख्या ही 3744 इतकी विक्रमी होती. आज सद्यस्थितीत हीच सभासद संख्या 2025 सालासाठी फक्त 2067 इतकी नीचांकी आहे. सभासद कमी होण्यामागचे कारण अनेक सदस्यांनी राजीनामे दिले, काही दूर गेले. ते संस्थेच्या रटाळ व एकतर्फी कारभाराला कंटाळले आहेत का? याला कारणीभूत असलेले घटक, एकाधिकारशाही, हुकूमशाही प्रवृत्ती असे म्हणायला वावगे ठरु नये.
गेली 12-15 वर्षे अनुकंपा भरती वगळता जिल्हा परिषदेत सरळसेवा भरती झाली नसल्याने नवीन सभासद होण्याचे प्रमाण अत्यल्प होते. मात्र दरवर्षी सरासरी 150 - 200 सभासद सेवानिवृत्त होतात. सेवानिवृत्तीमुळे सहाजिकच सभासद संख्या कमी झाली. ही बाब दरवर्षीच्या वार्षिक अहवालात स्पष्टपणे मांडलेली आहे. काही सभासदांनी त्यांना थकबाकीदार सभासदांची जामीनकी लागली म्हणून राजीनामे दिलेले होते. आता संस्थेचे कर्जाचा व्याजदर कमी झाला म्हणून त्यांना लाभासाठी परत सभासद व्हायचे आहे. जे सभासद जामीनकी लागली म्हणून संस्थेला वाऱ्यावर सोडून वैयक्तीक स्वार्थापोटी राजीनामा देतात त्यांना परत का म्हणून सभासद करुन घ्यावे? याबाबत वेळोवेळी वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहिर चर्चा झालेली असून संस्थेने आपली भूमिका उपस्थित सभासदांना पटवून दिलेली आहे.
जरुर विरोधकांनी आतापर्यंतचे संस्थेचे वार्षिक अहवाल वाचलेले नसावेत. यावरुन त्यांचा अभ्यास आणि संस्थेचे कामकाज जाणून घेण्याची तळमळ दिसून येते.
मतदार यादीमध्ये पात्र असूनही अनेक सभासदांची नावे दिसत नाहीत.
संस्थेची निवडणूक करोना, अतिवृष्टी, निवडणूका या कारणांमुळे शासनाकडून पुढे ढकलली जात असल्याचे सर्व सभासदांना माहितच आहे. शासनाने संस्थेच्या निवडणूकीसाठी पात्र मतदारांची मतदार यादी बनविण्यासाठी दि. 01/01/2025 ही कट ऑफ दिनांक ठरवून दिलेली आहे. सहकार कायद्यानुसार ठरवून दिलेल्या दिनांकाच्या दोन वर्षे आधी म्हणजेच दि. 01/01/2023 रोजी सभासद असणाऱ्या सभासदांचा मतदार यादीत समावेश होतो. तसेच थकबाकीदार सभासदास कायद्यानुसार मतदानाचा अधिकार नसल्याने प्रारुप मतदार यादी तयार करताना त्यांची नावे वगळण्यात आलेली आहेत. प्रारुप मतदार यादी प्रसिद्धीनंतर थकबाकी भरलेल्या सभासदांचा समावेश करण्याबाबत संस्थेने स्वत: निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र दिलेले आहे. उपनिबंधकांनी हरकती सुनावणी घेऊन त्यांचा मतदार यादीत समावेशही केलेला आहे. सहकार कायद्यानुसार मतदानास पात्र नसलेले दि. 01/01/2023 नंतरचे नवीन सभासद आणि थकबाकीदार सभासद वगळता संस्थेच्या 2067 सभासदांपैकी 1752 सभासद मतदानास पात्र झालेले आहेत.
प्रारुप मतदार यादी तयार केल्यानंतर गेल्यावर्षी बदल्या झाल्यामुळे सभासदांचे तालुके बदलले. ज्या सभासदांनी बदलीची माहिती कळविली आणि ज्यांची माहिती जिल्हा परिषदेकडून उपलब्ध झाली त्यांची नावे संबंधित तालुक्यात दर्शविण्यात आली. मतदार यादी अंतिम करण्यापूर्वी काही सभासदांनी कळविले नाही आणि काही सभासदांना बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त न केल्यामुळे त्याची नावे जुन्याच तालुक्यात राहिली. ही वस्तुस्थिती असून वस्तुस्थितीचा विपर्यास करुन थकबाकीदार सभासदांची नावे मतदार यादीतून वगळल्याचा बाऊ करणे चुकीचे आहे. मात्र ते विरोधकांच्या प्रवृत्तीला नक्कीच शोभते. यावरुन विरोधकांचा अभ्यास आणि हेतू याची कल्पना सुज्ञ सभासदांना आली असेलच.
सुवर्ण महोत्सवानिमित्त चांदीची नाणी वाटपाबाबतचा अपप्रचार.
संस्थेला जुलै 2014 मध्ये 50 वर्षे पुर्ण झाल्यामुळे सुवर्ण महोत्सवानिमित्त संस्थेने मार्च 2014 ते मार्च 2016 या कालावधीतील 3300 सभासदांना प्रत्येकी 11 ग्रॅमचे चांदीचे नाणे भेटवस्तू देण्यासाठी तयार करुन घेतलेली आहेत. प्रत्येक तालुका आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 2-3 वेळा कार्यक्रम आयोजित करुन आतापर्यंत 2259 नाणी वाटप करण्यात आलेली असून 1041 नाणी शिल्लक आहेत. नाणी वाटप करताना काही सभासद रजा, नाईट ड्यूटी इ. वैयक्तिक कारणांमुळे उपस्थित राहू शकले नसल्याने तसेच सेवा निवृत्त झालेल्या सभासदांची नाणी देणे बाकी आहे. तीही लवकरच वाटण्यात येतील. शिल्लक नाणी सुरक्षा कारणास्तव संस्थेत ठेवणे शक्य नसल्याने बँक लॉकरमध्ये ठेवलेली आहेत. नाणी वाटप करताना प्रत्येक सभासदाचा फोटो व व्हिडीओ शुटिंग करण्यात आलेले आहे. त्यामुळे सभासदांना वाटलेली नाणी, त्यांच्या सह्या, फोटो आणि शिल्लक नाण्यांचा हिशोब अचुक जुळत आहे. विरोधकांनी कधीही येऊन चांदीच्या नाणी वाटपाची तपासणी करावी आणि आरोप सिद्ध करण्याचं आव्हान स्विकारावं. केवळ निवडणूक काळात जाणीवपूर्वक नाणी वाटपामध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचा खोटा प्रचार विरोधक करत सुज्ञ सभासद जाणतात.
What is the objective of the panel?
The objective is to work in the interest of common servants and benefit the members.
How many candidates are in the panel?
21
What documents are required for voting?
Any identity card
How to vote?
Members can vote at their branch. Identity card is required.