2011 ते 2026 या कालावधीतील महत्वपूर्ण निर्णय वैशिष्ट्यपूर्ण कामे
Important Works
कर्ज वाटप -
पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्थांसाठी पतसंस्था नियामक मंडळाने ठरवून दिल्यानुसार संस्थेकडून सभासदांना कर्ज वाटप करण्यात येते. 2011 ते 2016 या कालावधीत मोठ्या कर्जाची मर्यादा 1.50 लाखावरुन 10 लाख केली. आणि 2016 ते 2026 या कालावधीत 10 लाखावरुन 30 लाख करुन कर्ज परतफेडीची मर्यादा 60 महिन्यांवरुन 240 महिन्यांपर्यत केली आहे. वेतनानुसार तातडी कर्ज मर्यादा 50 हजार ते 1 लाख केली आहे. 31 मार्च 2026 अखेर संस्थेचे एकूण कर्ज वाटप र. रु. 124 कोटी कर्ज वाटप केलेले आहे.
नियामक मंडळाने 2025 मध्ये वेतनानुसार कर्ज वाटप मर्यादा 1 कोटीपर्यंत करण्यास मान्यता दिलेली आहे. तथापि, कर्ज वाटप करत असताना संस्थाचालकांना स्वभांडवल, उपलब्ध निधी, कर्जे आणि ठेवीं यांच्याबरोबर सभासदांच्या कर्ज परतफेडीच्या क्षमतेचाही विचार करावाच लागतो. त्यामुळे टप्प्याटप्प्याने कर्ज मर्यादेत वाढ करुन आणि सभासदाची वेतन मर्यादा आणि कर्ज परतफेडीची क्षमता विचारात घेऊनच नियमानुसार प्रत्यक्ष कर्ज वाटपाचे आमचे धोरण संस्था आणि सभासदांच्या हिताचेच आहे.
आमच्या कार्यकाळात गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज आणि पर्यटन कर्ज प्रकार मंजूर करुन घेऊन या कर्जाच्या नियमांनाही मान्यता घेतलेली आहे. तथापि सर्वसाधारण (वैयक्तीक) कर्जाची मर्यादा वाढविल्यामुळे अद्याप या कर्जांचे वितरणास सुरुवात केलेली नाही.
कर्जावरील व्याजदरात 3 % कपात -
1 एप्रिल 2021 पासून दोन टप्प्यात कर्जावरील व्याजदरात 3% कपात करुन 10.5% वरुन 7.5% केल्यामुळे गेल्या 5 वर्षात सभासदांना कर्जावरील व्याजात लाखो रुपयांचा फायदा झालेला आहे. या निर्णयांमागची पार्श्वभूमी विशद करणं अत्यंत महत्वाचे आहे. सन 2021 - 2022 ते 2025 - 2026 या 5 वर्षांची आर्थिक पत्रके व वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अहवालाचा आपण अभ्यास केला असता आपल्या असे लक्षात येते की, दोन वर्षे व्याजदरात 3 % कपात करुनही ना संस्थेला तोटा झाला ना सभासदांना. सभासदांचा तर प्रचंड फायदाच झाला. तसेच संस्थेला आयकराबाबत आलेल्या अनुभवावरुन माफक व्याजदराने कर्ज वाटप करणेच संस्था आणि सभासदांच्याही हिताचेच आहे. त्या मागचा संस्थेचे उद्देश सभासदांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, सभासदांना कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्यासाठी प्रोत्साहन मिळावे आणि कमी व्याज दराने व व्याजात सवलत देऊन थेट व जास्त लाभ मिळवून देणे.
या निर्णयामुळे सर्व सभासदांना कर्जावरील व्याजादरात 3 % चा फायदा होत आहे. या निर्णयामुळे जसा सभासदांना व्यक्तिगत फायदे झाले तसेच संस्थेलाही काही फायदे झालेच आहेत. कर्ज वसूलीमधे वाढ होऊन पर्यायाने थकबाकीदार व थकबाकीचे प्रमाण कमी झाले. कर्जाची मागणी वाढून उलाढाल व उत्पन्न वाढले. व्याजादरात कपात व अतिरिक्त सूट दिल्यामुळे संस्थेचा नफा थोडा कमी झाला. मात्र, त्यापेक्षा कितीतरी जास्त सभासदांचा फायदा झाल्याचे आपल्या लक्षात आले असेलच. आणि सभासदांचा फायदा हाच संस्थेचा फायदा. त्यामुळे संस्थेला तोटा नाहीच.

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या सभासदांना व्याजदरात 1% सूट -
कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या सभासदांना कर्जावरील भरलेल्या व्याजादरात 1% सूट देण्याचा निर्णय संस्थेच्या इतिहासात प्रथमच घेतला गेला असून त्याची अंमलबजावणीही 01/04/2023 पासून करण्यात येत आहे. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या सभासदांना कर्जावरील व्याजादरात अतिरिक्त 1% सूट दिल्याने कर्जावरील प्रत्यक्ष परिणामकारक व्याजदर 6.5% झाला आहे. व्याजदरातील सूटीची रक्कम पात्र सभासदांच्या कर्ज खात्यात दरवर्षी 31 मार्च रोजी शिल्लक कर्जाच्या मुद्दालात जमा करण्यात येते.
कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या सभासदांना कर्जावरील व्याजादरात अतिरिक्त 1% सूट चा घसघशीत फायदा होऊन कर्जावरील प्रत्यक्ष परिणामकारक व्याजदर अंदाजे 6.5% झाला आहे. तसेच व्याजादरात कपातीमुळे सभासदांचा हप्ता कमी होऊन बचत वाढली. आणि व्याजदरात अतिरिक्त 1% सूट दिल्यामुळे कर्जाचे मुद्दल कमी होऊन हप्त्यांची संख्या आपोआप कमी झाली. तसेच त्यावरील व्याजही वाचते ते वेगळेच.
सभासदांनी संस्थेकडून घेतलेल्या कर्जापोटी भरलेलं व्याज आणि त्यांना कर्जावरील व्याजदरात मिळालेली 1% सूट, काटकसर निधीचे व्याज आणि मिळणारा लाभांश यांची तुलना केल्यास त्यांना प्रत्यक्ष कर्जावर केवळ 3 ते 4 % दरानेच कर्ज वापरत असल्याचे लक्षात येईल. अर्थातच, येणारी टक्केवारी सभासद निहाय वेगवेगळी असणार आहे. कृपया संदर्भांसाठी सन 2022-2023, 2023-2024 आणि 2024-2025 च्या वार्षिक अहवालांमधील मनोगत अवश्य वाचावे.
सन 2023 - 2024 मध्ये र.रु. 45,62,896/- व सन 2024 - 2025 मध्ये र.रु. 60,12,691/- इतक्या रकमेचा लाभ देण्यात आलेला आहे. सन 2025 - 2026 मध्ये अंदाजे र. रु. 75,00,000/- इतक्या रकमेचा लाभ देण्यात येणार आहे.

सभासद संरक्षण योजना -
2.1) कुटूंब संरक्षण योजना - सभासदांना मासिक 1000 रुपये वर्गणीमध्ये संपूर्ण कालावधीत र. रु. 10 लक्ष विमा कवच. सेवानिवृत्त / राजीनामा दिल्यास योजनेपोटी जमा रकमेच्या दुप्पट रक्कम सभासदास परत करण्यात येते.
सन 2011 - 2012 ते 2025 - 2026 या कालावधीत एकूण 201 मयत सभासदांच्या वारसांना र.रु. 10.91 कोटी इतका लाभ देण्यात आलेला आहे. सेवानिवृत्त / राजीनामा दिलेल्या सभासद व त्यांना दिलेल्या जमा रकमेच्या दुप्पट रक्कम लाभाची रक्कम वेगळी आहे.
2.2) सभासद मृत्यूफंड व कर्जमाफी योजना - सन 2018 - 2019 पासून सभासदांना वार्षिक 1000 रुपये वर्गणीमध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत र. रु. 2 लक्ष विमा कवच देणारी सभासद मृत्यूफंड व कर्जमाफी योजना सुरु करण्यात आलेली आहे.
या योजनेतून सन 2018 - 2019 ते 2025 - 2026 या 7 वर्षांच्या कालावधीत एकूण 88 मयत सभासदांच्या वारसांना र. रु. 1.76 कोटी इतका लाभ देण्यात आलेला आहे. सभासद मृत्यूफंड व कर्जमाफी योजनेतून मयत सभासदांच्या वारसांना लाभ देऊन 31 मार्च 2026 रोजी र.रु. 51.78 लक्ष इतका निधी शिल्लक आहे.
2.3) सभासद आपत्कालीन मदत निधी योजना - सन 2018 - 2019 पासून सभासदांना वार्षिक 600 रुपये वर्गणीमध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत अपघात झाल्यास औषधोपचारासाठी र. रु. 50 हजार मदत करण्यात येते.
या योजनेतून सन 2018 - 2019 ते 2025 - 2026 या 7 वर्षांच्या कालावधीत एकूण 51 सभासदांना / मयत सभासदांच्या वारसांना र. रु. 23.11 लक्ष इतका लाभ देण्यात आलेला आहे. सभासद आपत्कालीन मदत निधी योजनेतून सभासद / मयत सभासदांच्या वारसांना लाभ देऊन 31 मार्च 2026 रोजी र.रु.1.16 कोटी निधी शिल्लक आहे.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, सभासद मृत्यूफंड व कर्जमाफी योजना आणि सभासद आपत्कालीन मदत निधी योजना या दोनही योजनांसाठी सभासदांना स्वत: वेगळी वर्गणी भरण्याची आवश्यकता नाही. दरवर्षी संस्थेकडे सभासदांच्या जमा वार्षिक वर्गणीतून 31 मार्च रोजी या दोनही योजनांच्या वर्गणीची रक्कम कपात करुन घेण्यात येते.
सभासद आपत्कालीन मदत निधी योजनेचे यश पाहून कॅन्सर, ब्रेनस्ट्रोक, ह्रदय विकार, पॅरालेसिस, किडनी व यकृताच्या आजारांचा समावेश करण्यासाठी गेल्या 6 वर्षांपासून सातत्याने पोटनियम दुरुस्तीसाठी प्रयत्न करत आहोत. 2025 च्या पोटनियम दुरुस्तीस यंदा मान्यता मिळण्याची आशा आहे.
2.4) सभासद कल्याण निधी योजना - मयत सभासदाच्या अंत्यविधीसाठी या योजनेतून मयत सभासदाच्या वारसांना पूर्वी 5 हजारांची मदत करण्यात येत होती. 2016 पासून मदत रकमेत वाढ करुन र. रु. 15 हजार मदत तात्काळ करण्यात येते.
सभासद कल्याण निधी योजनेतून सन 2016 - 2017 ते 2025 - 2026 या 10 वर्षांच्या कालावधीत एकूण 118 मयत सभासदांच्या वारसांना र. रु. 17.70 लक्ष इतका लाभ देण्यात आलेला आहे.

स्थावर मालमत्ता खरेदी -
संस्थेने कोरोना काळात सभासदांच्या लाभांवर कोणताही परिणाम न करता संस्थेचे कार्यालय असलेल्या इमारतीमधेच सुमारे 1800 स्के. फुटांची मालमत्ता खरेदी करण्यात आलेली आहे. महत्वाचे म्हणजे आजघडीला सदर इमारतीच्या एकूण जागेच्या 20 % जागा संस्थेच्या मालकीची झालेली आहे.
सभासदांच्या पाल्यांसाठी (मुलांसाठी) वसतिगृह व गुणगौरव -
पुणे शहरात उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या सभासदांच्या पाल्यांसाठी कोरोना काळात संस्थेने खरेदी केलेल्या इमारतीमध्ये 24 बेडचे सर्व आवश्यक सोईंनी सुसज्ज असे वसतिगृह तयार केलेले आहे. निवासासोबतच वसतिगृहात स्वतंत्र अभ्यासिका, संदर्भासाठी ग्रंथालय, वाचनालयाची अभ्यागत कक्ष, वसतिगृहाच्या देखरेखीसाठी CCTV कॅमेरे इ. सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. कायदेशीर बाबीं व आवश्यक परवानग्याची पूर्तता करुनच यंदाच्या वर्षी वसतिगृह सभासदांच्या पाल्यांसाठी निश्चित उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
आगामी काळात सभासदांच्या मुलींसाठीही सोईंनी सुसज्ज असे वसतिगृह तयार करण्याचा मानस आहे. त्याचबरोबर सभासदांच्या पाल्यांना विविध विषयांच्या तज्ञांमार्फत मार्गदर्शन व चर्चेसाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे.

सभासदांच्या पाल्यांचा गुणगौरव -
सभासदांच्या उत्तम शैक्षणिक यश प्राप्त केलेल्या पाल्यांचे दरवर्षी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गुणगौरव करुन त्यांच्या पाठीवर कौतुक सोहळ्याची सुरुवात केली. पाल्यांना प्रमाणपत्र, ट्रॉफी, उत्तम पुस्तकांचा संच देण्यात येऊन प्रत्येकी र.रु. 1500/- बक्षीस पालकांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतात. सन 2011 - 2012 पासून गेल्या 14 वर्षात हजारो पाल्यांचा गुणगौरव करण्यात आला आहे.
संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त भेट -
संस्थेला जुलै 2014 मध्ये 50 वर्ष पुर्ण झाल्याने सुवर्ण महोत्सवानिमित्त मार्च 2016 रोजी संस्थेचे सभासदत्व असलेल्या सभासदांना “11 ग्रॅम शुद्ध चांदीचे नाणं” भेट देण्यात आले. आम्ही स्वत: रजा काढून प्रत्येक तालुक्यात पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी 3 - 4 वेळा कार्यक्रम आयोजित करुन सभासदांना नाणी वाटप केलेले आहे. कार्यक्रम आयोजित करुन चांदीच्या नाणं कटाक्षाने स्वत: सभासदाच्याच हातात नाणं देण्याचे धोरण अवलंबल्याने नाणी वाटपात अनियमितता झालेली नाही. बदली, सुट्टी व इतर वैयक्तीक कारणांमुळे अनुपस्थित राहिल्यामुळे काही सभासदांची नाणी वाटप करण्याचे राहिलेली आहेत. त्यांची नाणी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यात आलेली आहेत. ज्या सभासदांना अद्याप नाणं मिळालेलं नाही त्यांना आगामी काळात कार्यक्रम घेऊन नाणी वाटप करण्यात येणार आहे.
आयकर नोटीस, अपील व निकाल -
आयकर विभागाने संस्थेला दंडासहीत आयकर भरण्याबाबत दिलेल्या नोटिशीं विरोधात संस्थेने मा. आयकर आयुक्त यांचेकडे अपील केलेले आहेत. त्यापैकी 2 अपीलाचा निकाल संस्थेच्या बाजूने लागलेले आहेत. संस्थेने आतापर्यंत अपील चालविण्यासाठी आयकर ॲडव्हान्स पोटी 39.84 लक्ष आणि TDS पोटी 60.67 लक्ष असे एकूण 1.51 कोटी एवढी रक्कम आयकर विभागाकडे भरलेली आहे. त्यामुळे TDS आणि आयकर ॲडव्हान्स पोटी भरलेली रक्कम व्याजासह संस्थेस लवकरच मिळणे अपेक्षित असून त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
दैनंदिन कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर -
संस्थेने जिल्हा परिषद विभागांना सभासदांचे दरमहाचे कपातपत्र व त्यानुसार कपात केलेली रक्कम व कपातपत्र वसूली संस्थेकडे पाठविण्यासाठी pzps.org या संकेतस्थळावर Demand Management System (DMS) ही Online संगणक प्रणाली उपलब्ध करुन दिलेली आहे. या प्रणालीचे उद्घाटन मा. श्री सुरज मांढरे, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांच्या शुभहस्ते करण्यात आलेले असून ही प्रणाली डिसेंबर 2018 पासून विनाखंड सुरु आहे.
संस्थेच्या सभासद समर्पित पोर्टलद्वारे प्लॅटफॉर्मवर नवीन सभासद होण्यासाठी अर्ज, कर्ज मागणी, सभासदांच्या वैयक्तिक खात्याची माहिती, खाते उतारा, कर्ज थकबाकीबाबत दाखले, राजीनामा, KYC फॉर्म, वारसदार नेमणूक फॉर्म, नाव बदलणे, तक्रार निवारण इत्यादी विविध सेवा Online प्रदान करण्यात येणार असून त्याबाबतचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच सेवा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे.
सहकार क्षेत्रात होत असलेल्या तांत्रिक प्रगतीला आणखी गती देण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे नवनवीन व दर्जेदार सेवांची अंमलबजावणी करण्याबाबत प्रामाणिक प्रयत्न आम्ही केलेला आहे.

इतरांसाठी मार्गदर्शक -
आपली संस्था पगारदार सेवकांच्या पतसंस्थांमध्ये पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य सहकारी संस्था आहे. सभासद हिताचा आणि सर्वांगिण प्रगतीचा विचार करुन संस्थेच्या सभासदांसाठी विविध समुह योजना तयार करण्यामागची संस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाची प्रेरणा व भूमिका, योजनांची अंमलबजावणी आणि समुह सुरक्षा योजना राबवितानाचे आर्थिक गणित समजावून घेण्यासाठी आजवर महाराष्ट्रातील भाटा ॲटोमिक रिसर्च सेंटर कामगार पतसंस्था मुंबई, रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्था जि. रत्नागिरी, मोहोळ तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था जि. सोलापूर, शिरुर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था, 512 ॲमुनेशन फॅक्टरी कर्मचारी पतसंस्था, एक्साईड बॅटरी कामगार पतसंस्था पुणे, विद्युत कामगार पतसंस्था या व इतर अनेक नावाजलेल्या पतसंस्थांच्या संचालक मंडळांनी संस्थेला भेटी दिलेल्या आहेत.
ध्येयाप्रती वचनबद्धता -
2016 ते 2026 या कार्यकाळात संस्थेच्या माध्यमातून सभासदांच्या आर्थिक स्थैर्यासाठी अत्यल्प दरात सुलभ कर्ज पुरवठा, भक्कम समुह सुरक्षा आणि दर्जेदार सेवेचे ध्येय साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहिलो.
यापुढील काळातही “सेवा विकास पॅनल” च्या माध्यमातून मी व माझे सर्व सहकारी उमेदवार आमच्या ध्येयाप्रती वचनबद्ध राहून सातत्याने संस्थेच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहतील याची मी आपणा सर्व सभासदांना ग्वाही देतो.