मुख्य पान

पुणे जिल्हा परिषद सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या. पुणे

संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन 2026 ते 2031

 

सभासद बंधू आणि भगिनींनो,

सप्रेम नमस्कार.

आपल्या पुणे जिल्हा परिषद सेवकांची सहकारी पतसंस्थेची संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन 2026-2031 कार्यक्रम जाहिर झालेला असून मतदान बुधवार दि.29/04/2026 रोजी होणार आहे. मी स्वत:  व माझे सहकारी सेवा विकास पॅनेल मधून संस्थेची पंचवार्षिक निवडणूक लढवत आहोत. 

2011 सालची निवडणूक संस्थेमधील गैरकारभार, भ्रष्टाचार, अपारदर्शकता आणि एकुणच अराजकता या मुद्दयांवर लढवून निवडून आलो होतो. 2016 सालची निवडणूक आम्ही सहकारी सेवा विकास पॅनेलचे माध्यमातून केवळ सभासदांसाठी सेवा आणि सेवेतून संस्थेचा पर्यायाने सभासदांचा सर्वांगिण आर्थिक विकास या दोन प्रमुख उद्देशाने लढलो. आपण सर्व सुज्ञ आणि जाणकार सभासदांनी आमच्यावर विश्वास ठेवून सेवा विकास पॅनेलच्या 21 पैकी 20 उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून दिले. आणि निवडून आलेले 21 वे उमेदवार श्री नरेंद्र रामचंद्र मोहिते हेही माझे गुरुच असल्यामुळे एकादृष्टिने सभासदांनी संपुर्ण पॅनेलच निवडून दिला होता असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

सेवा विकास पॅनेलचे माध्यमातून केवळ सभासदांसाठी सेवा आणि सेवेतून संस्थेचा पर्यायाने सभासदांचा सर्वांगिण आर्थिक विकास याबरोबरच खंबीर, सक्षम व द्रष्ट्या नेतृत्वात संस्था जपण्याचा, दैनंदिन कामकाजामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करुन संस्था मोठी करण्याचे, वाढविण्याचे ध्येय बाळगून सभासदांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मी व माझे सहकारी उमेदवार पुन्हा एकदा 2026 ची निवडणूक लढवत आहोत.

संचालक म्हणून निवडून आल्यावर 2011 ते 2016 या 5 वर्षांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये संस्थेचा कारभारामध्ये पारदर्शकता आणून भ्रष्टाचार संपवून गैरकारभार व अराजकतेला आळा घातला. हे वास्तव आपणास ज्ञात आहेच. आणि पुढे 2016 ते 2026 या 10 वर्षांमध्ये संस्थेचा कारभारामध्ये सुधारणा करुन पारदर्शकतेच्या जोडीला शिस्त, नियमांनुसार कामकाज, धाडसी व ठोस निर्णय घेऊन त्यांची योग्य अंमलबजावणी केल्यामुळे आपल्या सर्वांच्या सहकार्याने संस्थेची सर्वांगिण प्रगतीसाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न खाली दिलेल्या संस्थेच्या व्यावसायिक आलेखातील आकडेवारीवरुन दिसून येतात. 

संस्थेचा व्यावसायिक आलेख -

अ.क्र.

तपशिल

दि. 31/03/2011

दि. 31/03/2017

दि. 31/03/2026

1

सभासद

3818

3305

2076

2

अधिकृत भाग भांडवल

20 कोटी

100 कोटी

100 कोटी

3

वसुल भाग भांडवल

15.79 कोटी

31 कोटी

32.74 कोटी

4

काटकसर निधी

4.98 कोटी

8.33 कोटी

29.83 कोटी

5

कर्ज वाटप

17.65 कोटी

54.52 कोटी

124 कोटी

6

राखीव निधी

4.98 कोटी

8.68 कोटी

13.77 कोटी

7

इमारत निधी

21.70 लाख

23.95 लाख

1.44 कोटी

8

महोत्सव निधी

1.43 लाख

73.07 लाख

48.51 लाख

9

कुटूंब संरक्षण योजना निधी

1.28 कोटी

5.44 कोटी

19.93 कोटी

10

सभासद मृत्यूफंड / कर्जमाफी योजना निधी

योजना दि. 01/01/2018 पासून सुरु केली असून दि. 31 मार्च 2026 पर्यंत 88 मयत सभासदांच्या वारसांना 1.76 कोटी मदत करण्यात आलेली आहे. 

51.78 लाख

(मदत देऊन 31 मार्च 2026 रोजीचा शिल्लक निधी)

11

सभासद आपत्कालीन मदत योजना निधी

योजना दि. 01/01/2018 पासून सुरु केली असून दि. 31 मार्च 2026 पर्यंत 51 सभासदांना 23.11 लाखांची मदत करण्यात आलेली आहे.

1.16 कोटी 

(मदत देऊन 31 मार्च 2026 रोजीचा शिल्लक निधी)

12

आवर्तक ठेव योजना

40.46 लाख

1.27 कोटी

56.07 लाख

13

बँक व इतर शेअर्स

15 लाख

1.50 कोटी

4.50 कोटी

14

बँकतील ठेवी

 

 

17.12 कोटी

15

एकूण उत्पन्न

2.60 कोटी

7.11 कोटी

9.85 कोटी

16

निव्वळ नफा

1.69 कोटी

2.90 कोटी

3.33 कोटी

17

खेळते भाग भांडवल

31.61 कोटी

71.22 कोटी

147.96 कोटी

 

गेल्या 15 वर्षांमध्ये संस्थ्‍ोच्या वार्षिक अहवालाचे माध्यमातून संस्थेच्या आर्थिकस्थिती पासून संचालक मंडळाचे उपस्थिती पर्यंतचे वास्तव पारदर्शकपणे सर्व सभासदांपर्यंत पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. गेल्या 10 वर्षांत घेतलेले धाडसी व ठाम निर्णय, घेतलेल्या निर्णयांची नियोजनबद्ध अंमलबजावणी, कामकाजातील पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा या सर्वांचे उत्तम परिणाम संस्थेच्या आर्थिक पत्रकांमधे स्पष्ट उमटले आहेत. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, 2011 च्या तुलनेत सभासद संख्या कमी होऊनही संस्थेचे खेळते भाग भांडवल, वसुल भाग भांडवल, काटकसर निधी, कर्ज वाटप, राखीव निधी, कुटूंब संरक्षण योजना, सभासद मृत्यूफंड/कर्जमाफी योजना निधी, आपत्कालीन मदत निधी, बँक व इतर शेअर्स, ठेवी, इमारत निधी, एकूण उत्पन्न इ. मधील अनेक पटींनी झालेली वाढ.

कदाचित म्हणूनच म्हणत असावेत की,  Numbers speak louder than words...!

 

2011 ते 2026 या कार्यकाळातील संस्थेची वैशिष्ट्यपूर्ण कामे -

         कर्ज मर्यादेत टप्प्याटप्प्याने वाढ करुन आणि सभासदाची वेतन मर्यादा आणि कर्ज परतफेडीची क्षमता विचारात घेऊनच नियमानुसार प्रत्यक्ष कर्ज वाटपाचे आमचे धोरण.

         कर्जावरील व्याजदरात 3 % कपात.

         नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या सभासदांना व्याजदरात 1% सूट.

         कुटूंब संरक्षण योजनेतून सभासदांना मासिक 1000 रुपये वर्गणीमध्ये संपूर्ण कालावधीत र. रु. 10 लक्ष विमा कवच. सेवानिवृत्त / राजीनामा दिल्यास योजनेपोटी जमा रकमेच्या दुप्पट रकमेचा लाभ.

         सभासद मृत्यूफंड व कर्जमाफी योजनेतून सभासदांना वार्षिक 1000 रुपये वर्गणीमध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत अतिरिक्त 2 लक्ष विमा कवच. 

         सभासद आपत्कालीन मदत निधी योजनेतून सभासदांना वार्षिक 600 रुपये वर्गणीमध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत अपघात झाल्यास औषधोपचारासाठी 50 हजारांची मदत. 

         विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, सभासद मृत्यूफंड व कर्जमाफी योजना आणि सभासद आपत्कालीन मदत निधी योजना या दोनही योजनांसाठी सभासदांना स्वत: वेगळी वर्गणी भरण्याची आवश्यकता नाही. 

         सभासद कल्याण निधी योजनेतून मयत सभासदाच्या अंत्यविधीसाठी वारसांना 15 हजार मदत. 

         संस्थेच्या दरमहा वसुलीसाठी pzps.org या संकेतस्थळावर Demand Management System (DMS) ही Online संगणक प्रणाली उपलब्ध करुन दिलेली आहे.

         संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त सभासदांना 11 ग्रॅम चांदीचे नाणं भेट.

         कोरोना काळात सभासदांच्या लाभांवर कोणताही परिणाम न करता सुमारे 1800 स्के. फुटांची स्थावर मालमत्ता खरेदी.  

         पुणे शहरात उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या सभासदांच्या पाल्यांसाठी (मुलांसाठी) 24 बेडचे सर्व आवश्यक सोईंनी सुसज्ज असे वसतिगृहाची उभारणी.

         दरवर्षी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांच्या उत्तम शैक्षणिक यश प्राप्त केलेल्या पाल्यांचा गुणगौरव करण्यासाठी कौतुक सोहळ्याची सुरुवात. गेल्या 14 वर्षात हजारो पाल्यांचा गुणगौरव करण्यात आला आहे.

         आयकर विभागाच्या विरुद्ध मा. आयकर आयुक्त यांचेकडील अपिलांपैकी 2 अपीलाचा निकाल संस्थेच्या बाजूने लागलेले आहेत. 

         कोरोना काळात PM Care Fund ला 3 लाख आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 5 लाखांची मदत.

         पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणाऱ्या सहकाऱ्यांसाठी जिल्हा परिषद प्रशासनाला आवश्यक साहित्य पुरविण्याचा निर्णय घेऊन अत्यंत गरजेच्यावेळी सॅनिटायझर व मास्कचा पुरवठा.

         गेल्या वर्षी राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. विशेषत: मराठवाड्यामधे मोठ्या प्रमाणावर हानी झाली. सामाजिक भान जपत राज्य शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन संस्थेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधे 25 लाखांची मदत केली. मदतीचा धनादेश राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. ना. अजित दादा पवार साहेबांकडे सुपूर्द करण्यात आला होता. स्व. दादांनी संस्थेचा अहवाल वाचून आर्थिकस्थिती जाणून घेऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस केलेल्या मदतीबद्दल कौतुक करुन संस्थेचे आभार मानले. आणि संस्थेला कसलीही मदत लागली तरी त्यासाठी आश्वस्तही केलं होतं.

संस्थेच्या कारभारात पारदर्शकता, सर्वसमावेशक धोरण, नियम व शिस्तीला प्राधान्य, कोणाचीही विशिष्ट मर्जी न राखता, वेळप्रसंगी कठोर आणि ठाम निर्णय घेऊन आणि केवळ सभासद हाच केंद्रबिंदू मानून मागील कार्यकाळात धाडसाने सुधारणा केल्या. त्यांची परिणामकारता संस्थेच्या प्रगतीने केंव्हाच सिद्ध झालेली आहे. त्यामुळे विरोधकांकडून गेल्या 15 वर्षांत आमच्यावर गैरकारभार, भ्रष्टाचार, अनागोंदी, फसवणूक असा कोणताच आरोप झालेला नाही. आणि खरंतर हिच आमच्या कामाची पावती आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 

एकमेव आरोप होतो तो म्हणजे, थकबाकीदार सभासदांना कर्ज देत नाही. नाहीच देत कारण, चुकीची व खोटी कागदपत्रे सादर करुन, अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करुन कर्ज मागणाऱ्या आणि थकबाकीदार सभासदांना कर्ज देणे संस्थेच्या हिताच्यादृष्टिने उचित नसल्याने अशी प्रकरणे जाणीवपूर्वक बाजूला ठेवण्यात आली. अर्थातच, संस्थेच्या हितापुढे अशा बिनबुडाच्या आणि नियमबाह्य आरोपांकडे मी दुर्लक्ष करण्याइतपतही लक्ष देत नाही. अशा आरोपांमागील वास्तव, अफवा आणि अपप्रचार यातला फरक तुम्ही जाणताच. निवडणूक काळात तर ते होणार आहेतच आणि होतीलही. जे 'सेट' करुन 'पसरवावे' लागते ते 'बनावट' आणि 'फेकच' असते. किंबहुना तसे असते म्हणूनच तर पसरविण्याचे कष्ट घ्यावे लागतात. सत्य जड असले तरी ते पसरवावे लागत नाही कारण ते आपोआप पसरते. तेव्हा मुद्दा निवडणूकीचा असो वा थकबाकीदारांना कर्ज न दिल्याचा. तो पसरवावा लागतो कारण तो असत्यच आहे. असत्य फार काळ टिकत नसले तरी अल्पकाल का होईना त्यावर विश्वास ठेवला जातोच. पण सारासार विचार न करता विश्वास का ठेवला जातो? हे वास्तव समजून घेण्याचा सध्या माझा प्रामाणिक प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे,

'निंदा कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, 

मज हे ही नाही ते ही नाही, वेगळा दोन्हींपासूनी. 

तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा...'

 

सहकारी संस्थेचा कारभार यशस्वीपणे चालविण्यासाठी सहकाराचा अभ्यास व सभासदांच्या सुख दु:खाची जाण असलेल्या संस्था चालकांची आवश्यकता असते. सहकारी संस्थेमध्ये सभासदांचा प्रतिनिधी या नात्याने निवडून येणाऱ्या प्रत्येक संचालकाने आपली सद्सद्विवेकबुद्धी जागरुक ठेऊन सातत्याने संस्थेच्या व पर्यायाने सर्वसामान्य सभासदांच्याच हिताचा विचार करणेच अभिप्रेत आहे. संस्थेचा कारभार करताना निश्चितच केवळ एक व्यक्ती चांगली असून चालत नाही. त्यासाठी सोबत साथ देणाऱ्या विश्वासू सहकाऱ्यांची सुद्धा नितांत आवश्यकता असते. तसेच बरोबरचे सहकारीही एक विचारांचेही असावे लागतात. एक विचार असेल तर अनेक अशक्य गोष्टी सहज सोप्या होऊन जातात. याच उत्तम उदाहरण म्हणजे, 2016 ते 2026 या कालावधीत कर्ज मर्यादा वाढ, कर्जावरील व्याजदरात कपात, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या सभासदांना व्याजदरात 1% अतिरिक्त सूट, स्थावर मालमत्ता खरेदी, सभासदांच्या पाल्यांसाठी (मुलांसाठी) वसतिगृह उभारणी यासारखे संचालक मंडळाने घेतलेले महत्वपूर्ण निर्णय आणि त्यांची केलेली नियोजनबद्ध अंमलबजावणी.

आपण आम्हाला संधी दिली म्हणून आपल्या पुर्वसुरींनी लावलेल्या या रोपट्याचे गेल्या 15 वर्षांत वटवृक्षात रुपांतर करण्याच कार्य आमच्या हातून घडू शकलं. मोठ्या कष्टाने उभा केलेला हा वटवृक्ष आज सभासदच नाही तर त्यांच्या कुटूंबियांसाठीही कल्पवृक्ष ठरतो आहे. आम्हाला मिळालेल्या संधीचं आम्ही सोनं केलं हे सत्य कोणीही नाकारु शकत नाही. आणि हे साध्य झाले ते केवळ आणि केवळ सभासदांनी आमच्यावर दाखविलेल्या विश्वासाच्या जोरावर. आणि म्हणूनच आम्ही ही निवडणूक केवळ ‘संस्था प्रथम’ हे ब्रीद घेऊन आणि ‘सभासद हित केंद्रस्थानी ठेऊन’ संस्थेच्या प्रगतीसाठीच लढवत आहोत. 

संस्था ही जिल्हा परिषदेतील कार्यरत सर्व संवर्गांची असल्यामुळे, पॅनेलमध्ये उमेदवारांची निवड करताना कोणत्याही एकाच संवर्गाच्या, ठराविक तालुक्यांनाच प्रतिनिधीत्व देऊन आणि काही तालुक्यांना प्रतिनिधीत्वच नाकारुन नेतृत्व सभासदांचा अपमान करत असल्याचे मी मानतो. त्यामुळे गतवेळी प्रमाणेच "सेवा विकास पॅनेल" मधे सर्व तालुक्यांना प्रतिनिधीत्व देऊन आणि जास्तीत जास्त संवर्गांना समावून घेऊन उमेदवारांची विचारपूर्वक निवड करण्यात आली आहे. प्रतिनिधीत्व देतांना परिचर, कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, अधिक्षक, कनिष्ठ लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, औषध निर्माण अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, पर्यवेक्षिका (ICDS), शाखा अभियंता या 14 संवर्गांतील जिल्हा परिषद मुख्यालय, पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पशुवैद्यकीय दवाखना अशा वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असलेल्या सभासदांना उमेदवारी देऊन सर्व समावेशक पॅनेल तयार केले आहे. विरोधी पॅनेलच्या उमेदवारीचा अभ्यास केल्यावर, मोजक्याच संवर्गांना आणि ठराविक तालुक्यांनाच प्रतिनिधीत्वासाठी झुकते माप दिल्याचे दिसून येते. सेवा विकास पॅनेल व विरोधी पॅनेल मधील हाच फरक ठळकपणे आपल्या लक्षात आल्याशिवाय नक्कीच राहणार नाही.

मी माझ्या एका वाक्यावर ठाम आहे, मी संस्थेत असलो म्हणून माझा व्यक्तिगत एक रुपयाचा फायदाही नाही; आणि नसलो म्हणून एक रुपयाचा तोटाही नाही. संस्थेत असण्या आणि नसण्यामुळे जो काही फायदा किंवा तोटा होणार आहे, तो कोणाचा? हे आपण निश्चितच जाणता. संस्थेच्या पर्यायाने सभासदांच्या उज्वल व सुखकारक भविष्यकाळासाठी सुयोग्य उमेदवार निवडणं हे सभासद म्हणून आपले केवळ कर्तव्यच नाही तर जबाबदारीही आहे. कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडताना, संस्थेच्या संचालक मंडळावर प्रामाणिक व नि:स्वार्थी नेतृत्वाखालील उमेदवार निवडून द्यायचे की स्वत: थकबाकीदार असलेले, थकबाकीदारांना जामीन असणारे पण जामीनकी न भरणारे, स्वयंमघोषित वाचाळवीर नेते? संस्थेचे हित विचारात घेऊन कोणाची निवड करायची हे मी सर्व सुज्ञ सभासदांवर सोपविलेलं आहे. आम्ही संस्थेच्या व सभासदांच्या सर्वांगिण आर्थिक विकासासाठी सेवा विकास पॅनेलच्या माध्यमातून आपणास सक्षम, समर्थ आणि योग्य पर्याय दिलेला आहेच. आपण सर्व सभासद योग्य निर्णय घेऊन आपले कर्तव्य आणि जबाबदारी निश्चितच पार पाडाल याची मला खात्री आहे. 

आपण सर्व जाणत्या सभासदांनी संधी दिल्यासआईच्या मायेनं व बापाच्या करारीवृत्तीनं आपली संस्था जपण्याचा, मोठी करण्याचा, वाढविण्याचा आमचा मानस आहे. आणि मी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आपणास तसे जाहिर वचन देतो. सेवा विकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांना विमान या चिन्हावर शिक्का मारुन प्रचंड बहुमताने निवडून देऊन आम्हाला सभासदांची सेवा व संस्थेचा सर्वांगिण आर्थिक विकास करण्याची संधी द्यावी असे आवाहन मी आणि माझे सेवा विकास पॅनेल मधील सहकारी उमेदवार करत आहोत. 

संस्थेच्या व पर्यायाने सर्व सभासदांच्या सर्वांगिण विकासासाठी आपण सर्व सुज्ञ मतदारांनी आपला आत्मसन्मानं व विवेक जागृत ठेऊन दि. 29 एप्रिल, 2026 रोजी सकाळी 9.00 ते सायं. 5.00 या वेळेत आपला मतदानाचा हक्क बजावून आपले बहुमोल मत सेवा विकास पॅनेलच्या विमान या चिन्हावर शिक्का मारुन सेवा विकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मतांनी संचालक मंडळावर निवडून द्यावे हीच आपणा सर्व सभासदांना नम्र विनंती.

धन्यवाद…! 

आपले विश्‍वासू,

योगेश मानसिंग नांदखिले

पॅनेल प्रमुख, सेवा विकास पॅनेल

9823996699

आणि सर्व सहकारी उमेदवार

सर्व मार्गदर्शक, सल्लागार, हितचिंतक आणि सभासद




सेवा विकास पॅनेलचा 2026 चा वचननामा

सभासद बंधु आणि भगिनींनो,

मी व माझ्या सर्व सहकाऱ्यांनी 2016 च्या निवडणूकीवेळी सभासद हा केंद्रबिंदू मानून आगामी 15 वर्षांचा संस्थेच्या व सभासदांच्या विकासाचा आराखडा बनविलेला आहेच. त्यातील पुर्ण झालेल्या योजनांमधे अधिक सुधारणा करुन अपुर्ण राहिलेल्या नावीन्यपूर्ण योजना आगामी काळात पुर्ण करण्यावर सेवा विकास पॅनेलचा भर असणार आहे. त्याचबरोबर प्रामुख्याने खालील नवीन सुविधा व योजनांचा विचारपूर्वक नव्याने समावेश केलेला आहे.

  1.         यापुढेही कायमच संस्थेच्या भ्रष्टाचारमुक्त, स्वच्छ व पारदर्शक आणि सर्वसमावेशक कारभाराची हमी.
  2.         कर्ज मर्यादा टप्प्या टप्प्याने वाढवून सभासदांना सुलभरित्या कमी व्याजदरात नियमानुसार जास्तीत जास्त कर्ज पुरवठ्याची हमी.
  3.         नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या सभासदांना व्याजदरात 1% ऐवजी 1.5% सवलतीची हमी.
  4.         संस्थेच्या हिरक महोत्सवानिमित्त सभासदांना शुद्ध सोन्याची भेटवस्तू देणार. त्यासाठी ताळेबंदात 48.51 लाखांची तरतूद केलेली आहे.
  5.         कुटूंब संरक्षण योजनेच्या वर्गणीत सुधारणा करुन लाभाची रक्कम 25 लाख करणार.
  6.         सभासद आपत्कालीन मदत निधी योजनेमध्ये कॅन्सर, पक्षाघात, मनक्याचे आजार अशा विविध आजारांचा समावेश करुन मदत निधीचा लाभ 50 हजारावरुन 1 लाख करणार.
  7.         सभासद मृत्यूफंड व कर्जमाफी योजनेच्या लाभाची रक्कम 5 लाख करणार.
  8.         सभासदांसाठी अत्यल्प दरात आरोग्य विमा कवच उपलब्ध करुन देणार.
  9.         संस्थेच्या दैनंदिन कारभारात तंत्रज्ञानाचा वापर वाढवून सर्व बँकिंग सुविधां App वर उपलब्ध करुन देऊन संस्थेची अद्यावत Website आणि Member Management System चे उद्घाटन करुन सर्व Online सुविधा सुरु करणार.
  10.     सभासदांचे पाल्यांसाठी (मुली) अद्ययावत वसतिगृह व अभ्यासिका तयार करणार.
  11.     सभासदांचे गुणवंत पाल्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना राबविणार.
  12.     सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांपेक्षा जास्त व्याजदर देऊन सभासदांकडून 100 कोटींच्या ठेवींचे संकलन करणार.
  13.     सभासदांना संस्थेच्या भाग भांडवल खरेदीसाठी प्रोत्साहन देऊन भाग भांडवल वाढविण्यावर भर देणार.
  14.     येणाऱ्या 5 वर्षात संस्था 300 कोटींचा व्यवसायाचा टप्पा पार करण्यासाठी प्रयत्न करणार.
  15.     2016 च्या वचननाम्यातील गृह प्रकल्प, अद्ययावत इमारत व सभागृह, सुसज्ज सहकारी हॉस्पिटल, फार्मसी व पॅथालॉजी लॅबची, गृह उपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू व स्टेशनरी मॉल, मनुष्यबळ पुरवठा करणारी स्वतंत्र उपसंस्था आणि सुसज्ज सहकारी बँक या मोठ्या व महत्वकांक्षी योजना आगामी काळात पुर्ण करण्यावर भर देणार.

या सर्व योजना नाविन्यपुर्ण असून सभासदांचे हित समोर ठेऊन सेवा विकास पॅनलच्या माध्यमातून वास्तवामध्ये उतरविण्याचे वचन आम्ही आपणास देत आहोत. संस्था चालविण्यासाठी व संस्थेचा चौफेर विकास करण्यासाठी लागणारी दुरदृष्टी, अंमलबजावणीतील व्यावसायिकता, सृजनशिलता, प्रामाणिकपणा आणि त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्याचे बळ केवळ सेवा विकास पॅनेल कडे आहे.

ब्लॉग / बातम्या

सेवा विकास पॅनेलची महत्वपूर्ण उपलब्धी
01-04-2026

सेवा विकास पॅनेलची महत्वपूर्ण उपलब्धी

सेवा विकास पॅनेलने गेल्या वर्षात अनेक महत्वपूर्ण कामे पूर्ण केली आहेत. सर्वसामान्य सेवकांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत.